कर्जमाफी योजना : Karjmafi yojana
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. या निवडणुकीत महायुती सरकारला खूप मोठे यश मिळाले. निवडणुकीनंतर 5 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी फक्त कर्जमाफीच नाही, तर इतर योजनाही आणल्या आहेत. उदाहरणार्थ, कापूस आणि सोयाबीन उत्पादनासाठी 5,000 रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. याशिवाय वीजपुरवठा सुधारणा आणि ‘लाडकी बहीण’ योजना अशा अनेक योजनाही जाहीर केल्या आहेत, ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल.
कर्जमाफीची मागणी आणि निवडणुकीतील परिणाम :
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांनी सरकारकडे कर्जमाफीची मागणी केली होती. पण त्यावेळी सरकारने याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारला मोठा फटका बसला. ही चूक पुन्हा होऊ नये म्हणून विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणि अनुदाने जाहीर केली, ज्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी कमी झाली.
कर्जमाफी केव्हा मिळेल?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत कर्जमाफीबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांनी सांगितले की, पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीसंदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावानुसार, जवळपास 85 लाख शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.