लाडकी बहिण योजनेसंदर्भात मोठी अपडेट ! मंत्री अदिती तटकरे यांची मोठी घोषणा, आता महिलांना….

लाडकी बहीण योजना:

विधानसभा निवडणुकीमुळे थांबवलेली लाडकी बहीण योजना आता पुन्हा सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे सरकारने सुरू केलेली ही एक महत्त्वाची योजना आहे, ज्यामध्ये पात्र महिलांना दरमहा ₹1500 दिले जातात.

आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता सहावा हप्ता, म्हणजेच डिसेंबरचा हप्ता, महिलांच्या खात्यात जमा होत आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत हा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात पोहोचेल, अशी माहिती सरकारने दिली आहे. या पैशामुळे महिलांना मोठा आधार मिळत आहे, आणि नवीन वर्षाच्या आधीच पैसे मिळाल्यामुळे त्यांना समाधान वाटत आहे.

योजनेसाठी एक नवीन अपडेट देखील समोर आले आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे की काही पात्र महिलांना एकूण ₹9000 मिळणार आहेत. मात्र, हा लाभ फक्त त्या महिलांना मिळेल ज्यांनी आपले बँक खाते आधारशी लिंक केले आहे.

जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज केलेल्या काही महिलांना आधार लिंक न केल्यामुळे पैसे मिळाले नाहीत. यावर मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, ज्यांनी त्या महिन्यात अर्ज केले असून आधार लिंक केले नाही, त्यांना नंतरच्या काळात अर्ज मंजूर झाल्यावर पैसे मिळतील.

ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत पण आधार लिंकच्या अडचणीमुळे पैसे मिळाले नाहीत, त्यांना जुलै महिन्यापासूनची रक्कम मिळणार आहे. म्हणजे, अशा महिलांना एकूण ₹9000 मिळतील, पण त्यासाठी आधार आणि बँक खाते लिंक करणे आवश्यक आहे.

ही योजना महिलांसाठी खूप महत्त्वाची आहे कारण ती आर्थिक आधार देते आणि त्यांचे जीवन थोडे सुलभ करते.

Leave a Comment